श्री इंद्रभानजी डांगे यांच्याविषयी........

             महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयात शिर्डीजवळ असणाऱ्या राहाता तालुक्यात असणारे दहेगाव हे छोटेसे गाव. याच गावात १ ऑगस्ट १९५२ रोजी श्री इंद्रभानजी डांगे यांचा जन्म झाला. वडील शेतकरी असल्याने घरची परिस्थिती बेताचीच अठराविश्व दारिद्रय काढीत होती. वडीलांच्या अकाली मृत्युने मोडकळीस आलेल्या संसाराचा खांब बनून अनंत यातना झेलत त्यांनी मराठी माध्यमातुन शिक्षण घेतले. हे शिक्षण घेतानांही आर्थिक अडचण मुळे त्यांना अनेक शाळा सोडून दुसऱ्या शाळामध्ये प्रवेश घ्यावा लागला. गरीबीचे चटके सहन करत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. हाताला काम व घरादारातील दुःख हटवण्यासाठी दाम मिळावे म्हणून विविध ठिकाणी नोकरी केली. परंतु काम मिळाले नाही. भावांना सांभाळण्याची जबाबदारी तसेच शिक्षण, बेकारी व्यवसायसासाठी पैसे मिळत नव्हते. अशावेळी आत्महत्येचा विचार मनात आला. परंतु सुदैवाने एका नातेवाइकाच्या सल्ल्याने आत्महत्येचा विचार सोडून देण्यात आला व १९७३ साली राहाता येथे भाडोत्री खोलीत दहा पैशाच्या अडीच खडूंनी डांगे क्लासेसची सुरुवात झाली.

जगावेगळा माणूस, जगावेगळी शाळा

अन्नाच्या भुकेत विचारांची भुक येऊन मिळाली म्हणजे क्रांतीची सुरुवात होते. अशीच क्रांती दहा पैशाच्या अडीच खडूंच्या माध्यमातुन घडवणाऱ्या श्री. इंद्रभानजी डांगे यांच्या अलौकिक शिक्षण ध्यासाचा अचुक बॅलन्सशीट म्हणजे त्यांचा डांगे पेंटर्न. गेल्या चाळीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या व अनेक शिक्षण संस्थाना दीपस्तंभ बनुन मार्गदर्शन करणाऱ्या शिर्डी जवळील राहाता येथील साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्री इंद्रभानजी डांगे यांच्या डांगे पॅटर्नचा व त्यांच्या कार्याविषयीचा घेतलेला आढावा.

श्री इंद्रभानजी डांगे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य

              दहेगावासारख्या खेड्यात जन्म झालेल्या इंद्रभानजी डांगे यांनी शैक्षणिक क्षेत्रात सतत वेगवेगळे प्रयोग करून आमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. आपण ज्या समाजात राहतो. त्या समाजाकडुन आपण अनेक गोष्टी आत्मसात करत असतो. समाजात राहूनच माणसाचे जीवन समृद्ध होत असते. समाजातील चांगल्या वाईट गोष्टीचा प्रभाव जीवनभर पडणे साहजिकच आहे. समाजाकडून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण घेतोच. परंतु हे ऋण आपल्याला फेडणे आवश्यक आहे. त्याऋणातून मुक्त होणे आवश्यक आहे.

             शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा विकास साधायचाच असतो. परंतु या विकासासोबत समाजविकासही साधणे आवश्यक आहे.समाजातीलदुर्बल घटकांना, मागास घटकांना समाज प्रवाहात आणणं अनिष्ठ रूढी अन परंपरा नष्ट करणे, पर्यावरण संतुलन, कुप्रथांना विरोध, भारतीय लोककलांचे संवर्धन तसेच संस्काराचे जतन करणे यासाठी प्रयत्न करण हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडत असताना आपल्या समाजसेवेनं निर्भेळ सेवा घडावी व समाज प्रगतीपथावर यात्रा समाजातील दैन्य नष्ट होऊन प्रत्येकाला समाधान प्राप्त व्हावे यासाठीश्री इंद्रभानजी डांगे यांनी केलेले सामाजिक कार्य हे अप्रतिम असेच आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयीचा आढावा...

दारुबंदी

             व्यसन हे कोणतेही असेल तर ते शरीराला हानीकारक असते परंतु दारु हे असे व्यसन आहे की जे सेवन करणाऱ्याच्या शरीरास हानीकारकच आहे. परंतु समाजालाही हानीकारक आहे. मद्यपान करणाऱ्या लोकांमुळे कुटुंबाची वाताहत तर होतेच परंतु समाजाचेही स्वास्थ्य बिघडते जी व्यक्ती दारूचे व्यसन करते तिच्यामुळे तिच्या आजुबाजुच्या परिसरात राहणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या या व्यसनाचा त्रास सहन करावा लागतो.

             समाजाच्या प्रगतीला अटकाव करणारे मद्यपानाचे व्यसन आपल्या गावातील कोणालाच नको व परिसरातील गावतही नको यासाठी श्री इंद्रभानजी डांगे यांनी केलेले कार्य अद्वितीय असेच आहे. दारुच्या व्यसनामुळे दहेगावमध्ये दर दोन चार दिवसांनी भांडणे आणि मारामारी होत. संध्याकाळच्या वेळी मद्यपींमुळे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गावात अशांतता निर्माण व्हायची.भांडणे व्हायची हा प्रकार बंद करण्यासाठी इंद्रभानजी डांगे यांनी विशेष प्रयत्न केले दहेगावातील व आजूबाजूच्या गावातील वयस्क मंडळीना समजावून दारूबंदी केली.

शिवी बंदी

             मातृदेवो भव: म्हणून आईला ईश्वर मानणाऱ्या भारतीयांची संस्कृती फार महान अशी आहे. आईने बालकांसाठी सोसलेले कष्ट ज्याचे मोजमाप होऊच शकत नाही म्हणून तर आईला सर्वश्रेष्ठ मानले जाते. आई इतकेच महत्व बहीणीलाही आहे.

        आई व बहीण या मुकुटमणी म्हणुन मिरविणाऱ्या या देशात अनेक खेड्यामध्ये गावामध्ये शहरांमध्ये त्यांचा उल्लेख असणारे अपशब्द वापरले जावू नयेत म्हणून संपूर्ण भारतात राबविला जावा असा शिवी बंदी प्रकल्प इंद्रभानजी डांगे यांनी राहाता व पंचक्रोशीत सुरू केला. लोकांनी आपसात भांडु नये वादविवाद रोखता येतच नसेल तर किमान भांडणात केली जाणारी अर्वाच्य शिवी बाजी नको. शिवीमुळे समोरची व्यक्ति चिड़ते व हाणामारीपर्यंत वाद विकोपाला जातो. श्री इंद्रभानजी डांगे यांनी हा विचार गावकऱ्यांमध्ये रुजवला कोणतेही कारण असो शिवी द्यायची नाही याविषयी जनजागृती केली व परिसरातील गावामध्येही शिवी बंदी उपक्रम राबवण्यात आला. अशाप्रकारे शिवीबंदी हा प्रकल्प म्हणजे श्री इंद्रभानजी डांगे यांनी दिलेले समाजासाठी वरदानच आहे.

तंटामुक्त ग्राम संकल्पना

             छोटी मोठी खेडी व शहरे जोडुन अखंड भारताची निर्मिती करण्यात आलेली आहे. या आनंदी खेड्यांना कौटुंबिक कलह सामाजिक, आर्थिक आणि राजकिय या बाधांमुळे ग्रहण लागत आहे. प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी जपणारी माणसंच जेव्हा आपली न राहता परस्परांमध्ये वाद घालतात. तेव्हा होणारे दुख हे खुप मोठे असते प्रत्येक घरांत असणारे लहान वाद हे उग्र रूप धारण करतात. म्हणून सामोपचाराने वाद नष्ट करून तंटामुक्त ग्राम संकल्पना श्री इंद्रभानजी डांगे यांनी १९७२-१९७३मध्ये राबविली.

             राहाता, दहेगाव, पिंपळस परिसरांतील गावामधुन जर पोलिस स्टेशनला वर्षभर एकही तक्रार गेली नाही तर अशा गावांना बक्षिसे देण्याच घोषित केले. त्यामुळे परस्परांमधील मतभेद कमी होण्यासाठी मदत झाली तसेच खेड्यामधील वाद संवादाने सोडविले गेल्यामुळे तंटामुक्त ग्राम संकल्पना ही फलदायी झाली. श्री इंद्रभानजी डांगे यांच्या या तंटामुक्त गाव संकल्पनेमुळे गावातील वाद संपुष्टात आलेच परंतु गावाच्या विकासासाठी विविध योजनाही आखण्यात आल्या व त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.

कृषी पर्यटन व सहलीचे आयोजन

             पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली गेली तर शेती उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते. कृषी विषयक माहीती आपल्याला मिळते. बघितलेल्या गोष्टींचा अंतर्भाव विकासासाठी करता येऊ शकतो पर्यटनामुळे ज्ञान वाढते. विकासविषयक दृष्टी विशाल बनते ही बाब श्री इंद्रभानजी डांगे यांना माहीत असल्यामुळे त्यांनी गावाच्या हितासाठी कृषी पर्यटन सहलीचे आयोजन केले. आपल्या स्कुलबसमध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केले. श्री आण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार इ. अनेक गावामध्ये शेतकऱ्यांना नेऊन तेथे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहीती शेतकऱ्यांना करून दिली. जलसंधारणाचे मोठे मोठे प्रकल्प त्यांनी गावकऱ्यांना दाखविले व पाणी आडवा, पाणी जिरवा च्या माध्यमातून नवदिशा बहाल केली.

             वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनाला शेतकन्यांना त्यांनी बसेस मधुन नेत शेतीच्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाची माहीती शेतकऱ्यांना करुन दिली. दहेगाव, कोऱ्हाळे पिंपळस इ. अनेक गावात कुऱ्हाड बंदी आणि चराई बंदी श्री इंद्रभानजी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली. शेतक-यांच्या या पर्यटन सहलीमुळे गावातील शेतक-यांची शेती करण्याची पद्धती बदलली, गावाचा कायापालट होऊन शेतीविकास साधला गेला.

हेलकरणी प्रकल्प

             पुरातन काळापासुन वृक्षसंगोपनाची परंपरा चालत आलेली आहे. हीच परंपरा हेलकरणी प्रकल्पाच्या माध्यमातुन श्री इंद्रभानजी डांगे यांनी हा ग्राम पातळीवर विकसित केली. नवरात्री दरम्यान परिसरातील गावांमध्ये असणान्या भगिनींसाठी श्री इंद्रभानजी डांगे यांनी हा हेलकरणी उपक्रम राबविला. हेलकरणी हे पारंपारीक नाव आहे. यात वेगवेगळ्या गावांतून स्त्रिया डोक्यावर कलशामध्ये पाणी भरुन आणत. त्या कलशाची पूजा करत. गावांमध्ये वृक्षारोपणामध्ये लावलेल्या झाडांना ते पाणी कलशांमधील पाणी टाकत. या काळात प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटलेली असे. धर्म जसा समाजाच्या विकासाला कारणीभूत आहे तसेच धर्म-धर्मांमधील वाद हे समाजाच्या अधोगतीस कारणीभूत आहे. भारताची सर्वधर्मसमभाव ही संकल्पना पुरातन कालापासुन चालत आलेली आहे.

             एका विशिष्ठ धर्माला प्राधान्य न देता आपण एकच आहोत ही भावना लोकांमध्ये रुजावी म्हणून त्यांनी आपल्या गावामध्येव परिसरातील गावांमध्ये सर्वधर्मीय प्रवचनाचे आयोजन केले. सर्व धर्मिय प्रार्थना घेतल्या एका विशिष्ठ धर्माच्या प्रार्थनाच पाठ न करता सर्वधर्माच्या प्रार्थना पाठ कराव्यात असे त्यांनी सांगितले. हिंदु, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध असा भेद न करता त्यामध्ये असणारा धार्मिक वेगळेपणा हा सर्वांनाच आनंद देणारा कसा ठरेल याकडे लक्ष द्यावे. श्री इंद्रमानजी डांगे यांनी फक्त हिंदुच्या मंदिरांनाच देणग्या दिल्या नाहीत तर जैन मुस्लिम शीख यांच्या धर्मप्रसाराचे काम त्यांनी केलेले आहे. स्वतः हिंदु असुनही आपल्या शैक्षणिक संकुलाला एका जैन साध्वीचे नाव दिले हे सर्वधर्मसमभावाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.

विविध ठिकाणी व्याख्याने व समाजप्रबोधन

             धार्मिकतेचा पगडा खूप खोलवर भारतीय माणसात रुजलेला आहे. खरा धर्म सोडुन मांत्रिकाने सांगितलेल्या धर्मालाच माननारे लोक आजही आहेत. त्यातुनच अंधश्रद्धेचा जन्म होतो. अंधश्रद्धेमुळे आर्थिक व मानसिक हानी होते ही समाजाला लागलेली कीड नष्ट व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्तम कार्य श्री इंद्रभानजी डांगे यांनी केलेले आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात अंगात वारे येणे हा प्रकार सर्रास अनेक गावांमध्ये पूर्वी चालत असत. विविध देवदेवता अंगात येतात हे एक ढोंग आहे. याविषयी त्यांनी जनजागृती केली. अनेक वैज्ञानिक संकल्पना लोकांना समजावून सांगितल्या.ढोंगी साधूंना थारा दिला नाही. त्यांच्या गावात नवरात्रीच्या काळात विस्तवातुन चालण्याची प्रथा होती ती त्यांनी बंद केली.

             उत्सव काळात तमाशा आजुबाजुच्या गावांमध्ये आणला जायचा तमाशा फडांना निमंत्रन देणे बंद केले, त्यामुळे पंचक्रोशीत सात्विकता वाढली. नवस फेडण्यासाठी लोक पशुहत्या करत त्यांनी त्यावर बंदी आणली. शाकाहाराचे महत्व पटवून दिले. गावात व पंचक्रोशीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे संत महंताच्या कीर्तनाचे, प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले. हजारों जणांना माळी घातल्या व शाकाहारी बनविले. जयपराजय न मानता पंचक्रोशीतील गावांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल कबडी व पारंपारीक खेळांच्या स्पर्धा भरविल्या.

१. जिजामाता माँटेसरी स्कुलची स्थापना

             डांगे क्लासेसची प्रसिद्धी सर्वदूर अशी त्या काळात झालेली होती. राहाता पंचक्रोशीत त्या काळात बहुसंख्य मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही शाळा होत्या त्यात श्रीमंताचीच मुले शिकत होती. इंग्रजी माध्यमातील शाळांबाबत पालकांची उदासीनता होती तसेच आर्थिक सुबत्ता असणाऱ्याची शाळा म्हणून जनमानसात इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी मनोधारणा झालेली होती. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या गरीबांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळाले पाहीजे, या उद्देशाने श्री इंद्रभानजी डांगे यांनी डांगे क्लासेस सांभाळुन ४ जानेवारी १९७५ रोजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली.

             सार्वभौम राजा बनुन जनतेचा छत्रपती झालेल्या शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. परंतु श्री शिवाजी महाराजांना शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याविषयी प्रत्येक मराठी माणसाला परम आदर आहे. इंग्रजी भाषेला वाघिणीचे दुध समजले जाते. प्रत्येकालाच इंग्रजी भाषा अवगत झाली पाहीजे या उदात्त हेतुने व राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्ववातुन प्रेरणा घेऊन या स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेचे नावही जिजामाता माँटेसरी स्कुल असे ठेवण्यात आले. इंग्रजी माध्यमीची शाळा असली तरी भारतीय संस्कार व संस्कृती संवर्धन या स्कुलमधुन केले जाईल असा मानस श्री इंद्रभानजी डांगे यांचा होता तो आजही तंतोतंत पाळला जात आहे. जिजामाता माँटेसरी स्कुलच्या स्थापनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांसाठी इंग्रजी माध्यमातून शिकण्याची संधी उपलब्ध झाली.


२. कोणतेही आर्थिक धार्मिक राजकिय पाठबळ नसलेली शाळा

             समाजात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. काही शैक्षणिक संस्था या राजाश्रयाच्या जोरावर तर काही देणग्यांच्या मदतीने प्रगती साधत आहेत. या स्कूलच्या स्थापनेपासून ते आजपावेतो या शैक्षणिक संकुलाला कोणत्याही नेत्याचे, धार्मिक साधु संताचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे आर्थिक पाठबळ मिळालेले नाही. दहा पैशाच्या अडीच खडुंनी सुरुवात झालेली स्कुल आज हेच अनेक विद्यार्थ्यांचा जीवनविकास साधत आहेत. हेच इंद्रभानजी डांगे यांच्या कार्याचे गमक होय त्यांनी अविरत परीश्रमातुन हा वटवृक्ष बहरवला आहे.

              १९७५ साली सुरु झालेल्या जिजामाता माँटेसरी स्कुलचे विद्यार्थी १९८७ साली १० वी ची परीक्षा देऊन बाहेर पडले. या १० पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जीवनभर पुरेल एवढी संस्काराची शिदोरीही या स्कुलमधुन मिळविली.


३. साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूल असे नामकरण

             स्कुल सुरु करण्यापूर्वी या स्कूलमधुन भारतीय संस्कृतीचे संवर्धन केले जाईल हीच संकल्पना श्री इंद्रभानजी डांगे यांची होती. अध्यात्मिक अधिष्ठाण कोणत्याही कार्यात महत्वाचे असते. साध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांच्याबद्दल श्री इंद्रभानजी डांगे यांना मुळातच आदर होता. ते त्यांना गुरु मानत असत. प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या विचारांतुनच आत्मिक समाधान प्राप्त होऊन स्कुलची वाटचाल होत होती. म्हणुन स्कुलला साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश स्कूल असे नाव १९८१ साली देण्यात आले. परंतु संस्थेचे नाव हे जिजामाता एज्युकेशन सोसायटी हेच राहीले.

४. डांगे पॅटर्नची सुरुवात

             मराठी माध्यमातून शिकुनही शिडीजवळील राहाता या ठिकाणी श्री इंद्रभानजी डांगे यांनी साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना केली. फक्त विद्यार्थ्यांना शिकवत न बसता शिक्षण प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून सतत नवनवीन प्रयोग केले . ते शिक्षण क्षेत्रात संकल्पना करत गेले. त्यांनी संकल्पनांचा संग्रह जो कोणताही विद्यार्थ्याला अडथळे पार करुन यशापर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग ठरला आहे. या प्रवाहालाच समाजाने डांगे पॅटर्न  हे नाव दिले.


५. डांगे पॅटर्न अंतर्गत स्कुल

             श्री इंद्रभानजी डांगे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील विविध उपक्रम बघुन अनेक शिक्षण संस्थानी डांगे पॅटर्न चा अंगिकार केलेला आहे. डांगे पॅटर्न अंतर्गत महाराष्ट्रात धुळे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर व राहाता इ.ठिकाणी सुमारे २५ स्कुल्स सुरु झालेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, पाथर्डी, अहमदनगर व राहाता तालुक्यात डांगे पॅटर्न अंतर्गत चालणाऱ्या शाळा सुरु झालेल्या आहेत.


प्रीति पार्क

स्कूल कॅम्पस

फोटो गॅलरी

सन्माननीय दादाजी यांना मिळालेले पुरस्कार

संपर्क